काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना प्रथमोपचार पेटीचे वाटप

104

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोशिएशन व साई मल्हार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांसाठी प्रथमोपचार पेटी व वेदनाशामक मलम व तेल यांचे वाटप करण्यात आले.

तुकोबांच्या पालखीने आकुर्डीतील मुक्कामानंतर शनिवारी पुण्याकडे प्रस्थान ठेवले. काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशन व साई मल्हार सोशल फाऊंडेशनने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पालखीचे स्वागत केले. यावेळी किरणकुमार निकम, परविंदरसिंग बाध, प्रशांत कदम, म्हाळाप्पा दुधभाते, स्वनिल जंगम, अक्षय भड, किशोर पाचपुते, तेजस साळवी, सचिन दोरगे, शिवाजी फुलारे, विनीत कलाटे, आशिष परमार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

पावसाळ्यामुळे वारी दरम्यान चालताना वारकऱ्यांना आरोग्य विषयक समस्या उदभवू नये यासाठी खबरदारी म्हणून काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोशिएशन व साई मल्हार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी प्रथमोपचार पेटी, वेदनाशामक मलम व तेल मॉइश्चरायझर क्रीम यांचे वाटप असोशिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.