जनावरांच्या गोठ्यात काम करणाऱ्या एका तरुण मजुराला बैलाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.१३) दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडला.

शशिकांत चिरोजीलाल धोबी (वय २२, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे बैलाच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शशिकांत आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी मधील स्मशानभूमीजवळ असलेल्या ग्यानसिंग श्रीपत यादव यांच्या गोठ्यात काम करत होता. दररोजप्रमाणे आजही तो गोठ्यात स्वच्छतेचे काम करत होता. दोनच्या सुमारास गोठ्यातील बैलाने त्याला अचनाक धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. शशिकांतला तात्काळ उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.