काळेवाडीत सव्वा लाखांची घरफोडी; दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे फरार

0
572

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – दरवाजाचे कुलुप तोडून काही अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ६६ हजारांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही चोरी शनिवारी (दि.१) सकाळी ११ ते रात्री ९ च्या दरम्यान काळेवाडी नढेनगर येथील भगवती टॉवर बी विंग या इमारतीच्या फ्लॅट नं.२ मध्ये घडली.

याप्रकरणी एका २९ वर्षी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २९ वर्षी महिला या काळेवाडीतील नढेनगर येथील भगवती टॉवर बी विंग या इमारतीच्या फ्लॅट नं.२ मध्ये राहतात. शनिवारी त्या त्यांच्या फ्लॅटला कुलुप लावून बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील कपाटात ठेवलेले ६६ हजारांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १६ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.