काळेवाडीत महापर्व महोत्सवाचे सुभाष कोठारी यांच्या हस्ते उद्घाटन

131

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – काळेवाडी येथील मुनी सुब्रत जैन श्वेतांबर मंदिरात महापर्व व नवकार ग्रह महोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली. या महोत्सवाचे पुणे जिल्हा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोठारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या महोत्सवात दररोज २ लाख जप, मंत्रांचे पठण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निर्विघ्न  पार पाडण्यासाठी राजू मेहता, प्रशांत हिंगट, महेंद्र मेहता, अशोक चव्हाण, सोहन राठोड, जयंती भाई, प्रविण बाफना, मुकेश कोठारी परिश्रम घेत आहेत.