काळेवाडीत बांधकाम साईटवरुन पडून कामगाराचा मृत्यू

107

काळेवाडी, दि. १९ (पीसीबी) – बांधकाम साईटवर काम करत असताना दहाव्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास जे एन बिल्डर यांची विजयनगर काळेवाडी येथील आदी अम्मा ब्लीस या बांधकाम साईटवर घडली.

शहाबन अली सय्यदअली (वय १९, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याने ठेकेदार दिनेश कुशवाह (वय 33, रा. थेरगाव) विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास जे एन बिल्डर यांची विजयनगर काळेवाडी येथील आदी अम्मा ब्लीस या बांधकाम साईटवर काम सुरू होते. या साईटवर शहाबन कामाला होता. काम करताना त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवली नव्हती. यामुळे तो काम करत असताना बांधकाम साईटवरील दहाव्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याने ठेकेदार दिनेश कुशवाह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.