काळेवाडीत फिरस्त्याने विवाहित महिलेला स्पर्श करुन केला विनयभंग

1134

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका विवाहित महिलेला नको त्या ठिकाणी स्पर्श करुन फिरस्त्या तरुणाने विनयभंग केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.१०) रात्री साडेसातच्या सुमारास काळेवाडीतील इंगळे हॉस्पीटल जवळ घडली.

याप्रकरणी पीडित ३१ वर्षीय महिलेने (रा.काळेवाडी) वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दिलीप रामचंद्र यादव (वय ३८, रा. इंगळे हॉस्पीटलमागे, काळेवाडी मुळ.रा. अहलादपुर, इलाहबाद) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ३१ वर्षीय महिला या सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास काळेवाडी येथील इंगळे हॉस्पीटल जवळून पायी चालल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या  दिलीप याने महिलेला नको त्या ठिकाणी स्पर्श करुन त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी दिलीप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करत आहेत.