काळेवाडीत पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून दुचाकीस्वार फरार

232

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – मोबाईलवर बोलत पायी घरी निघालेल्या एका पादचाऱ्यांचा मोबाईल दुचाकीवरील दोघांनी हिस्का मारुन चोरुन नेला. ही घटना काळेवाडी फाटा येथे सोमवार (दि.३) रात्री नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सागर हरीचंद्र कुमार (वय ३६, रा. काळेवाडी) यांनी दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी सागर हे त्यांचे काम आटपून मोबाईलवर बोलत काळेवाडी फाटा येथील त्यांच्या घरी निघाले होते. यावेळी मागून एक दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सागर यांनी कानाला लावेला मोबाईल जबरदस्तीने हिस्का मारुन चोरुन नेला. वाकड पोलिस तपास करत आहेत.