काळेवाडीत नग्न अवस्थेतला व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग

148

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – एका २६ वर्षीय विवाहितेला नग्न अवस्थेतील आणि पॉर्न व्हिडिओ पाठवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.४) दुपारी पावनेदोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी पिडित २६ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २६ वर्षीय महिला या सोमवारी दुपारी पावनेदोनच्या सुमारास काळेवाडी येथील त्यांच्या घरी होत्या. यावेळी अज्ञात आरोपीने दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन महिलेच्या मोबाईलवर नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केला. तसेच त्यांना पॉर्न व्हिडिओ पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.