काळेवाडीत तीन दुकानांची तोडफोड; एका माथेफिरुला अटक

20

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – काळेवाडीतील तापकीर चौकात असलेल्या तीन दुकानांची तोडफोड करुन तेथील कामगारांना मारहाण केल्या प्रकरणी एका माथेफिरुला पोलिसांनी अटक केली आहे. या तोडफोडीत मेडिकल , बेकरी आणि एका कापड दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (बुधवारी) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान घडली.

वाकड पोलिसांनी याप्रकरणी संतोष पानसरे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तो माथेफिरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील तापकीर चौकात आज (बुधवार) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान संशयित आरोपी संतोष पानसरे याने साई मल्हार या मेडिकल दुकानावर तुफान दगडफेक  केली. यानंतर त्याने बाजूलाच असलेल्या बैंगलोर अंय्यगार बेकरी आणि कापड दुकानाचीही तो़डफोड केली. तसेच या दुकानातील कामगारांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

काही सतर्क स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावर तातडीने पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि संतोष पानसरे याला अटक केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.