काळेवाडीत आई रागावल्याने १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

11

आई रागावल्याने इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काळेवाडीतील नढेनगर येथे शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.

शेजल दोरास्वामी मुदालियार (वय१४, रा. राधाकृष्ण मंदिराजवळ, नढेनगर काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरगावी जायचे असल्याने आईने गुरूवारी शेजलला घरातील साफ सफाई करण्यास सांगितले. मात्र, साफसफाई न केल्याने शेजलला आई रागावली होती. या कारणावरून शेजलने शुक्रवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आई आणि वडील कामावर गेले होते. दोघेही शेजलला फोन करत होते. शेजलने बराच वेळ फोन न उचलल्याने त्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्याला फोन करून याची माहिती दिली.

शेजारी शेजलला सांगण्यासाठी घरी गेला असता दरवाजा बंद होता. त्यावेळी त्या शेजऱ्यांने  खिडकी मधून बघतले असता शेजलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून  आले. त्यानंतर याबाबतची माहिती शेजलच्या आई आणि वडिलांना देण्यात आली. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव करत आहेत.