काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर शाळेत गोपालकाला-दहीहंडी उत्सव साजरा

144

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – काळेवाडी येथील  भाऊसाहेब तापकीर शाळेतील बाल गोपाळांनी दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. दहीहंडीत पोहे, लाह्या, दही, साखर, केळी अशा अनेक मिश्रणांनी बनविलेला काला हा प्रसाद म्हणून सर्व गोपाळांना वाटण्यात आला.

सोहम वानखेडे या पहिलीतील मुलाने दहिहंडी फोडण्याचा मान मिळविला. दहीहंडी फोडल्यानंतर श्रीकृष्णाची यथासांग पुजा करुन सामुहिक  कृष्णगीत विद्यार्थ्यांनी गायन करुन हा सोहळा साजरा केला.

कृष्णलीला आणि श्रीकृष्णाच्या प्राचीन गोष्टी शिक्षकांकडून सांगण्यात आल्या. शिक्षीका उल्का जगदाळे आणि जयश्री पवार यांनी संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली होती. याप्रसंगी विद्यार्थी-पालक उपस्थित होते.