काळा पैसा अमित शहा, पंकजा मुंडेंच्या बँकांमध्ये – नवज्योतसिंह सिद्धू

0
1678

पुणे, दि. ५ (पीसीबी) – मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्याच्या  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकांमध्ये  काळा पैसा जमा झाला, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला.  

अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी ५ दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंतीभाई आणि पंकजा मुंडे यांच्या बँकांमध्ये पैसा जमा झाला, असे सिद्धू यावेळी  म्हणाले.

भारती अभिमत विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत सिध्दू बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पोपट झाल्या  आहेत.  सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था नाचत आहेत. देशामध्ये ९३ टक्के लोक कॅशने व्यवहार करत आहेत. कॅशलेस हा तुघलकी निर्णय आहे. काळा पैसा हा देशात नव्हे, तर परदेशात सोने, स्थावर मालमत्तामध्ये आहे, असे ते म्हणाले.