काळवीट शिकार प्रकरण; सोनाली बेंद्रे, सैफ अली खान अडचणीत येण्याची शक्यता  

256

जयपूर, दि. १५ (पीसीबी) – काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देणार असल्याची महिती आज (शनिवार) राज्य सरकारने दिली. त्यामुळे अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू, सैफ अली खान या कलाकारांना काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाच्या सुनावणीला जवळपास पाच महिने झाले आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून आवाहन देण्यात येणार आहे. याच प्रकरणात अभिनेता सलमान खानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, याच चित्रपटातील त्याचे सहकलाकार अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान यांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.