काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला आहे. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत या प्रकरणातील अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. थोड्याच वेळात सलमानला शिक्षाही सुनावण्यात येणार आहे.

सुनावणी सुरू होताच सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले. पण त्याने सर्व आरोप फेटाळले. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र, सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.