कालिया नाग नक्की कोण होता आणि काय कारण होत त्याच यमुनेत लपण्याचं…

57

भारतात नल, कवर्धा, फणि-नाग, भोगिन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदि, शिशूनंदी किंवा यशनंदी, तनक, तुश्त, ऐरावत, धृतराष्ट्र, अही, मणिभद्र, अलापत्र, कम्बल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना, गुलिका, सरकोटा या नावानी नागवंशीय आहेत.

पुराणकथानुसार ऋषी कश्यपांच्या पत्नी कद्रू यांच्यापासून त्यांनी अनेक नागांना जन्म दिला. जसे की अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पिंगला, पद्म, महापद्म, शंख, कुलिक, चूड़, धनंजय. अग्नीपुराणात तब्बल ८० प्रकारांच्या नागांच्या कुळाचे वर्णन केले गेले आहे. असे म्हणतात की, कालिया नाग देखील कद्रुचें पुत्र आणि पन्नग जातीचे नागराज असे. कालिया नाग पूर्वी रमण नावाच्या बेटांवर राहत होते. पक्षिराज गरुड यांच्याशी त्यांची शत्रुता वाढल्यामुळे ते आपल्या बायकांसह यमुनेत वास्तव्यास गेले.

कारण त्यांना ही गोष्ट ठाऊक होती की, यमुनेसारखी दुसरी सर्वोपरी सुरक्षित जागा कोणतीही नाहीये आणि शिवाय या ठिकाणी गरुड सुद्धा येऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर याच जागी आधी गरुड यमुनेत असलेले मासे खाऊन टाकायचा. यामुळे संतप्त होऊन तपस्वी सौभरीं यांनी त्याला श्राप दिला कि, ‘जर का आता तू इथे येऊन मत्स्यांना भक्षण करशील तर तू मृत्यूला प्राप्त होशील’, आणि हेच दुसरे कारणं आहे कि, कालिया नाग इथे लपून राहत होते. यमुनेचे सगळे पाणी कालियाच्या विषामुळे विषारी होत होते. परिणामी गोकुळवासीयांना यमुनेचे पाणीच मिळत नव्हते. जर कोणी चुकूनही कालिया कुंडाच्या जवळ गेलेच तर कालिया त्याला खाऊन टाकत असे. त्यामुळे त्याला कालिया दाह म्हणत असे.असं म्हणतात कि, ‘एकदा मात्र सवंगड्यांसह खेळत असताना श्रीकृष्णाचा चेंडू यमुनेच्या कुंडात पडला. आणि तो चेंडू घेण्यासाठी श्रीकृष्ण यमुनेच्या त्या भागात झेप टाकतात आणि पाण्याखाली जाऊन कालिया नागाशी युद्ध करतात आणि कालियाला शरण येण्यास भाग पाडतात. तेव्हा कालिया जीवाची भिक्षा मागतात. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात की,’तू तिथेच जाऊन वास्तव्य कर जेथे आधी वास्तव्यास होता. यावर कालिया म्हणतो की, ‘तिथे आपले सेवक पक्षीराज गरुड आहेत जे माझे शत्रू आहे.’ त्यावर श्रीकृष्ण म्हणतात की,’आपल्या डोक्यावर माझ्या पायाचे ठसे उमटलेले बघून गरुड तुला काहीच करणार नाहीत’. मग तेव्हा कालिया नाग आपल्या बायकांसह परत रमण बेटांवर निघून जातात.

WhatsAppShare