‘काला’ची प्रदर्शनापूर्वीच २३० कोटींची कमाई

302

मुंबई, दि.६ (पीसीबी) – रजनीकांत यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘काला’ चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांच्यासोबत नाना पाटेकर आणि हुमा कुरेशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. रजनीकांत यांचा चित्रपट म्हटले की त्याच्या कमाईची देखील चर्चा तितकीच होते. बॉक्स ऑफीसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २३० कोटींची कमाई केली आहे.

चित्रपट प्रक्षेपणाचे आणि गाण्याचे हक्क विकून ‘काला’ने सुमारे २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. तामिळनाडूमध्ये ७० कोटी रुपये, आंध्रप्रदेश आणि निजाममध्ये ३३ कोटी रुपये, केरळात १० तर उर्वरीत देशात ७ कोटी रुपयांत हे हक्क विकले गेले आहेत. तर देशाबाहेर ४५ कोटी रुपयांना प्रक्षेपणाचे हक्क विकण्यात आले असून एकूण १५५ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय गाण्याचे हक्क ७५ कोटींना विकून एकूण कमाई सुमारे २३० कोटी रुपये इतकी झाली आहे. यावरून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.