कारमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होते; पोलिसांना लागली खबर अन् रचला सापळा..

42

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – कार मधून विक्रीसाठी जात असलेल्या दोघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी लक्ष्मी पॅलेस हॉटेल जवळ हिंजवडी येथे केली.

किरण ज्ञानोबा साळुंके (वय 41, रा. भुमकर चौक, वाकड), प्रशांत चौधरी (रा. रहाटणी, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. किरण साळुंखे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश पांढरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू विक्री करण्यासाठी कार मधून (एम एच 12 / एफ पी 4508) जात होते. पोलिसांनी हिंजवडी येथे लक्ष्मी पॅलेस हॉटेल जवळ सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, कार आणि मोबाइल फोन असा एकूण 56 हजार 528 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. किरण साळुंखे याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare