कारच्या काचा फोडून 32 हजारांचा ऐवज पळवला

14

बावधान, दि. २२ (पीसीबी) – पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधून 32 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री सव्वा नऊ ते अकरा वाजताच्या सुमारास एनडीए रोड बावधन येथे घडली. दत्ता नारायण इथापे (वय 38, रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इथापे यांची कार एम एच 11 / एल डब्ल्यू 9839 आणि एम एच 02 / ए पी 8848 या दोन कारच्या काचा फोडून कारमधून लॅपटॉप व इतर कागदपत्रे असा 32 हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare