कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघे जखमी

96

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. आरोपी कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास फुगेवाडी येथे घडली.

पंकज पुंडलिक मोहिते (वय 27, रा. दापोडी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते आणि त्यांची मावस बहीण त्यांच्या दुचाकीवरून फुगेवाडी येथून जात होते. सुखवानी गार्डन समोरील उड्डाणपुलावर आल्यानंतर एका अनोळखी कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची मावस बहीण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare