कारची काच फोडून आयपॅड पळवले

42

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – अण्णासाहेब मगर स्टेडियम पिंपरी येथील गार्डन जवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून कार मधून अॅपल कंपनीचा आयपॅड मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते दहा वाजताच्या कालावधीत घडली.

टी एन उमामहेश्वरन (वय 59, रा. औंध) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 10) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी यांनी त्यांची कार नेहरूनगर पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ असलेल्या एम्पायर गार्डन जवळ पार्क केली होती. अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या कारची काच फोडून कारचे नुकसान केले. तसेच कार मधून 47 हजार 500 रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा आयपॅड मोबाईल चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare