कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराला मारहाण

158

हिंजवडी, दि. ९ (पीसीबी) – कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगारांना हाकलून देऊन एका कामगाराला काठीने मारहाण केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७) रात्री जांभुळकरवस्ती, हिंजवडी येथे घडली.

जगदीश धिवलाल चव्हाण (वय ३२, रा. जांभुळकर वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अमोल जगन इंगळे (वय २६, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या अन्य सहकारी कामगारांनी आरोपीकडे काम केले होते. त्या कामाचे पैसे मागण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने फिर्यादी यांना कामाचे पैसे न देता शिवीगाळ करून धमकी देत बांबूच्या काठीने पायावर मारहाण केली. त्यांनतर फिर्यादी आणि इतर कामगारांना शिवीगाळ करून हाकलून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे

WhatsAppShare