कामशेत व वडगाव पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिरवडे गावात ३५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

90

मावळ, दि.१९ (पीसीबी) – कामशेत व वडगाव पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिरवडे गाव येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आली. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पहाणी केली. व त्या व्यक्तीस तपासणी साठी पाठवण्यात असता आज सकाळी त्या व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले. अशी माहिती तहसीलदार बर्गे यांनी दिली. तसेच सध्या त्या व्यक्तीस पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालय येथे ठेवले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले.

WhatsAppShare