कामशेत बोगद्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

546

कामशेत, दि. ४ (पीसीबी) – कामशेत बोगद्याजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास झाला.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या  इंडिका कारने (क्र.एमएच/१४/ जीएच/८२३९) रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक (क्र.एमएच/४६/एएफ/०४१०) ला मागून जोरदार धडक दिली. त्या कारमधून तीनजण प्रवास करत होते. या अपघातात तिघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.