कामशेत बोगद्याजवळ कारचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

418

पुणे, दि. १२ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळून भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळून कार क्रमांक (केएल/०५/एक्यू/९७०६) वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गाच्या बाजूला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.