कामशेतमध्ये दगडाने ठेचून २४ वर्षीय तरुणाचा खून

61

कामशेत, दि. ८ (पीसीबी) – कामशेतमध्ये दगडाने ठेचून अज्ञातांनी एका २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी अडीचच्या सुमारास कामशेत येथील भाजगाव डोंगराच्या पायथ्या येथून उघडकीस आली.

याप्रकरणी वृषाली बाबाजी गरुड (वय २८, रा. भाजगाव, कामशेत) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी अडीचच्या सुमारास कामशेत येथील भाजगाव डोंगराच्या पायथ्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत एका २४ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची माहिती कामशेत पोलिसांना फिर्यादी यांनी दिली. यावर पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी एका २४ वर्षीय तरुणाचा नगन अवस्थेत दगडाने ठेचून खून केल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. कामशेत पोलीस अधिक तपास करत आहेत.