कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे निधन

52

पनवेल, दि. ९ (पीसीबी) – कामगार नेते आणि अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांचे आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. खांदा कॉलनी येथील निवासस्थातून दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

श्याम म्हात्रे यांच्यावर दादर येथील धन्वंतरी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पक्षात दोन मुली आणि पत्नी असे कुटुंब आहे. त्यांच्या निधनाने कामगारांचा आधारवड हरवला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.