कानपूर पोलीस अधीक्षकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

181

कानपूर, दि. ५ (पीसीबी) – कानपूरमधील शहर पोलीस अधीक्षक सुरेंद्रकुमार दास यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक कलाहामुळे सुरेंद्रकुमार दास हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. त्या तणावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले असेल, अशी शक्यता त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सुरेंद्रकुमार दास हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची कानपूरला बदली झाली होती. त्यांची पत्नी कानपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार ते उत्तर प्रदेशमधील बलिया येथील रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक सुरेंद्रकुमार दास यांना सध्या जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती नाजूक असून येते काही तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.