कात्रज-कोंढवा रस्त्यावर विचित्र अपघात; चार वाहने एकमेकांवर आदळली

378

पुणे, दि. ७ (पीसीबी) –  पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशीन चौकाजवळ आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. या अपघातात चार ते पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यारील खडी मशीन चौकाजवळून स्टील प्लेटने भरलेल्या एका कंटेनरने समोरून जाणाऱ्या चार वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे घाबरलेल्या एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता चालकाने लगेच पळ काढला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळबंली होती.