कागदी रॉकेट उडवण्याच्या वादातून १२ वीतल्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण; एकाचा मृत्यू

161

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – कागदी रॉकेट उडवण्याच्या वादातून १२ वीतल्या विद्यार्थ्याला वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२) नागपूरमधील जी. एस. महाविद्यालात घडली.  

राहुल तिवारी असे हत्या झालेल्या १२ वीतील विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जी. एस. महाविद्यालातील कॉमर्स शाखेतील १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या राहुल तिवारी या विद्यार्थ्याचे वर्गातीलच दोन विद्यार्थ्यांशी  कागदी रॉकेट उडवण्यावरुन भांडण झाले होते.  यामध्ये त्या तिघांमध्ये मारहाण झाली,  मारहाणी दरम्यान राहुल जमिनीवर पडला आणि यामुळे झालेल्या दुखापतीत त्याचा मृत्यू झाला. मात्र, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. राहुलचा मृत्यू नैसर्गिक आहे, असे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अखेर राहुलच्या कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी प्राचार्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.