काँग्रेस विरोधकाची भूमिका निभावण्यात अपयशी – पंतप्रधान मोदी

35

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – ‘गेल्या चार वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. आधी जनतेने त्यांना चांगले सरकार देण्यास अपयशी ठरल्याबद्दल आणि निर्णय घेण्याची अक्षमता आणि भ्रष्टाचारामुळे सत्तेवरुन खाली खेचले. आता ते विरोधकांची भूमिका निभावण्यातही अपयशी ठरत आहेत’, अशी कडाडून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी बोलत होते.  गेल्या चार वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात त्यांना यश आलेले नाही, असे मोदी म्हणाले.

काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र काम करुन गेल्या चार वर्षांत लोकांसमोर मुद्दे आणले असते, तर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. मात्र, गेल्या चार वर्षात त्यांना काही पडलेली नाही. निवडणुका जवळ आल्याने आता सर्वजण  एकत्र आले आहेत’, अशीही  टीका  मोदींनी यावेळी केली.