काँग्रेस प्रवक्त्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्यास अटक

94

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या मुलीला ट्‍विटरद्वारे बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गिरीश असे या आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. 

गिरीशने प्रियांका चतुर्वेदी यांच्या कन्येला बलात्काराची धमकी दिली होती. याप्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते.

आरोपीने त्याच्या ट्‍विटर हँडलच्या माध्यमातून अश्लिल भाषेत ट्‍वीट करून बलात्काराची धमकी दिली होती. गृहमंत्रालयाने ट्‍विटरला अकाउंट यूजर ‘एटगिरीशके १६०५ बाबत सविस्तर तपशील मागविला आहे.