काँग्रेस नेत्याकडून राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस  

367

बुलडाणा, दि. ६ (पीसीबी) – महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी जाहीर केले आहे.

राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात रॅली काढून कारवाई करण्याची मागणी करत आहेत. तर   सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

दरम्यान बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी राम कदम यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’, या विधानावर राम कदम यांनी माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.