काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या ‘या’ कट्टर समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

106

भंडारा, दि.१८ (पीसीबी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यूक्ष सर्यकांत इलमे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे महाराष्ट्राचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आदी नेते उपस्थित होते.

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर प्रशांत पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.” आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकादेखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

WhatsAppShare