काँग्रेसने पाठवले पार्सल; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भरावी लागणार रक्कम

104

दिल्ली, दि.२७ (पीसीबी) – नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवर याबाबत ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. संविधानाची प्रत पाठवत काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलेय की, ‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला भारतीय संविधानाची एक प्रत पाठवली असून लवकरच तुम्हाला मिळेल. देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा.’ काँग्रेसने आपल्या ट्विटरवर मोदींना संविधानाची प्रत पाठवल्याचा अॅमेझॉनवरील स्नॅपशॉट पोस्ट केला आहे.

काँग्रेसने आणखी एका ट्विटमध्ये भाजपावर टीका केली आहे.

काँग्रेसने एकापाठोपाठ चार ट्विट केले आहे.