काँग्रेसच्या ‘भारत बंद’मध्ये शिवसेना सहभागी होणार नाही – संजय राऊत   

263

मुंबई, दि.९ (पीसीबी) –  इंधनदरवाढीच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी (दि.१०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. विरोधी पक्षाला उशिरा जाग आली आहे. आम्ही आधीपासून महागाई वाढल्याचे सांगत आलो आहोत. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असेही राऊत यांनी सांगितले.

काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. महागाई व इंधन दरवाढीविरोधात नेहमी केंद्र व राज्य सरकारवर टीका करणारा भाजपचा सहकारी पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खासदार

महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे आम्ही पूर्वीपासून सांगत आहोत. आम्हाला जनतेच्या भावना माहीत आहेत. आम्ही जनतेसोबतच आहोत असे सांगत विरोधकांनी महागाईविरोधात खुशाल आंदोलन करावे. जेव्हा ते अपयशी ठरतील, तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मनसैनिक स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.