काँग्रेसच्या ‘भारत बंद’मध्ये ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि ‘राहुल गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा

340

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – देशभरामध्ये इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज (सोमवार) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या आंदोलनादरम्यान, इंधन दरवाढ मागे घेण्याबरोबरच राजकीय घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र, काही ठिकाणी या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरुद्ध अर्थाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ भाजपनेच आपल्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि ‘राहुल गांधी मुर्दाबा’च्या घोषणा दिल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून भाजपने काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात मोदींचा जयघोष झाल्याचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये भाजपने, काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात, राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा असे ट्विट केले आहे.

दरम्यान, लोकसभा आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांचा सोशल मीडिया सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पातळीवर देशातील प्रमुख राजकीय पक्ष निडवणुका लढवणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.