काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन

48

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चाणक्यपुरीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक मोठा नेता गमवला आहे.