काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर मंदिरात कोसळून जखमी; डोक्याला ११ टाके   

87

तिरुवअनंतपुरम, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेसचे खासदार शशी थरूर  मंदिरात  दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी  पूजेच्या विधीदरम्यान तुला करताना  ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला असून, ११ टाके पडले आहेत. ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली.

शरूर काँग्रेसच्या तिकीटावर तिरुवअनंतपुरममधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आज सकाळी प्रचाराला बाहेर पडल्यानंतर त्यांनी एका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पूजेच्या विधीदरम्यान त्यांची तुला करण्यात येत होती. त्याचवेळी अचानक खाली कोसळले.

या घटनेमुळे मंदिरात काही वेळ गोंधळ उडाला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला मार लागला असून जखमेच्या ठिकाणी ११ टाके पडले आहेत. आता थरूर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला  दिला आहे.