काँग्रेसची इंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबररोजी भारत बंदची हाक

95

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी  भारत बंदची हाक दिली आहे. या बंदची घोषणा काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (गुरूवार) केली.  

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीमुळे देशातील सामान्य जनता हैराण झाली आहे. जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठीच काँग्रेसकडून या बंदची हाक देण्यात आली आहे, असे अशोक गेहलोत आणि रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

या बंदमध्ये विरोधी पक्ष तसेच सामान्य नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.