कस्पटे वस्ती जेष्ठ नागरीक महासंघाचा वर्धापन दिन आमदार अश्विनीताई जगताप यांच्या उपस्थिती पार

71

वाकड, दि. २० (पीसीबी) – कस्पटे वस्ती जेष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन सोहळा आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थित व माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे यांच्या सहयोगाने उत्साहात पार पडला.

मान्यवरांच्या शुभहस्ते संघ स्मरणिकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास, आमदार महेश लांडगे, आमदार सौ. उमा खापरे, विधानसभा कार्यकारिणी सदस्य शंकर जगताप, माजी नगरसेवक मोरेश्वर शेगडे, रणजित आबा कलाटे फाऊंडेशनचे अध्यक्ष स्नेहा कलाटे, कस्पटेवस्ती व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण येदुभाऊ कस्पटे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे प्रा. राजा दीक्षित, फेस्कॉम महाराष्ट्रचे अध्यक्ष अरुण रोडे, फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, पिपरी चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृशाली मरळ उपस्थित होते.