कसबा पेठेत १७ वर्षीय तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

280

पुणे, दि. २३ (पीसीबी) – कसबा पेठेत एका १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास घडली.

माधवी विशाल काळे (वय१७) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी माधवी शिकवणीला गेली होती.  ती दुपारी एकच्या सुमारास घरी परतली, घरी येताच ती थेट कसबापेठेतील तीच्या राहत्या घराच्या छतावर गेली, आणि कुणाला काही कळण्याच्या आत तिने खाली उडी मारली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. फरासखाना पोलीस तपास करत आहेत.