कवतुकास्पद: आकुर्डीतील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी  पोलिसांसोबत साजरे केले रक्षाबंधन

134

निगडी, दि. २६ (पीसीबी) – आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी निगडी पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण कक्षातील पोलिस अधिकारी अर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

सामाजिक सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबला जातो. या उपक्रमात ५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तर या उपक्रमा अंतर्गत कोणीतरी आमची दखल घेतय अशी भावना व्यक्त करत पोलिसांचे चेहरे हर्ष उल्हासाने फुलले होते. याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक एन. के . घोगरे यांनी व मुख्य पोलीस प्रबंधक रविंद्र जाधव यांनी अनुक्रमे ९ वी व ५वी ते ७वी च्या विध्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पोलिस मोठ्या संख्येने होते.