कर्नाटकात विजय साजरा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अॅसिड हल्ला

193

बेंगळुरू, दि. ३ (पीसीबी) – कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये  सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असताना त्यांच्यावर अॅसिड हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात २५ कार्यकर्ते  जखमी झाल्याचे सांगितले जात आहेत.   

तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्ते विजय साजरा करत होते.  तेव्हा हा अॅसिड हल्ला कऱण्यात आला आहे.  या हल्ल्यामागे कोण आहे, या हल्ल्याचा उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान,  आतापर्यंत जाहीर झालेल्या २  हजार २६७ जागांच्या निकालंमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला ८६४, भाजपला ७८८ तर जेडीएस आणि अपक्षांना २७७ जागांवर विजय मिळाला आहे.