कर्नाटकातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; ३४ हजार कोटींची कर्जमाफी

53

बेंगलुरु, दि.५ (पीसीबी) – कर्नाटकातील शेतकऱ्यांना सरकारने खूप मोठा दिलासा दिला असून ३४ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी आपले पहिले बजेट विधानसभेत मांडण्यास सुरुवात केली असून यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यासोबतच कुमारस्वामी यांनी निवडणुकीआधी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन पुर्ण केले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानुसार, शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केले जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाखांचे कर्ज माफ होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत घेण्यात आलेल्या कर्जावरही दिलासा देण्यात आला आहे. बजेट मांडण्याआधी कुमारस्वामी यांनी हा आपला पहिलाच अनुभव असून, एक आव्हान म्हणून याकडे पाहत असल्याचे म्हटले होते.