कर्नाटकमध्ये महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या महिला कबड्डी संघाचा डंका

131

महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन महिला कबड्डी संघ प्रथम

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – कर्नाटक राज्यातील चिक्कुर बागलकोट येथे झालेल्या ऑल इंडिया निमंत्रित महिला खुला गट कबड्डी स्पर्धेत महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन महिला कबड्डी संघाने विजयी घोडदौड करत पहिला क्रमांक मिळवला आहे. या संघाने महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशनचा डंका कर्नाटक राज्यात वाजवला आहे. या कामगिरीबद्दल महिला कबड्डी संघाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

बागलकोट येथे नुकत्याच ऑल इंडिया निमंत्रित महिला खुला गट कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशनचा महिला कबड्डी संघ सहभागी झाला होता. महिला कबड्डी संघाने सुरुवातीपासून चमकदार कामगिरी केली.

कबड्डी स्पर्धेत महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन महिला कबड्डी संघाची कर्नाटकच्या अल्वास कबड्डी संघ (बिद्दर) या संघाशी लढत झाली. हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा आणि अटीतटीचा झाला. या अटीतटीच्या सामन्यामध्ये कर्नाटकच्या अल्वास कबड्डी संघ (बिद्दर) या संघाला नमवत महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन महिला कबड्डी संघाने प्रथम पारितोषिक मिळवले.