कर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू

371

लोणावळा, दि. १९ (पीसीबी) – कर्जत तालुक्यातील कळंब या ठिकाणी आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळच्या सुमारास घडली.

मायरा सर्फराज पटेल (वय ९) आणि तय्याबा सुहेल ताडे (वय ७) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवारी) सुट्ठी असल्याने मायरा आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. यावेळी तिची मैत्रिण तय्याबाही तिच्यासोबत होती. आईची नजर चुकवून मायरा व तय्याबा पाण्यात उतरल्या. पण पाण्याच्या खोलीचा बेत न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. या घटनेत दोन्ही मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, दोन्ही मुली आपल्याला नदीवर सोडून पुन्हा घरी गेल्या असाव्या असे त्यांच्या आईला वाटले. कपडे धुवून झाल्यानंतर आई घरी गेली. मात्र, दोन्ही मुली घरी आल्या नसल्याने तिला समजले. त्यानंतर कुटूंबीयांसह नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. नदीवर या दोघी गेले असल्याने प्रथम त्यांनी नदीवर शोध घेतला. तेंव्हा या दोघी नदीच्या दगडांच्या कपारीमध्ये मृतावस्थेत आढळळ्या. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या सहाय्याने दोघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पोलिस तपास करत आहेत.