कर्जत-जामखेडमधून रोहित पवार फिक्स ?

153

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुक पार पडल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या विधानसभा मतदासंघातकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिणाहुन शरद पवार यांचे दुसरे नातू निवडणुक लढणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कर्जतजामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रोहित पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे दोनच उमेदवार इच्छुक आहेत. अशात, मतदारसंघातील विविध प्रश्न सक्षम विरोधकाचा विचार करता रोहित पवार यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हेच असतील हे निश्चित झाले आहे.