करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनादरम्यान चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू ; सर्मथकांवर पोलिसांचा लाठीमार

85

चेन्नई, दि. ८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांची  अंत्ययात्रेला दुपारी ६ वाजता सुरूवात झाली. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पहाटे चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच द्रमुकचे राज्यभरातील कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने चेन्नईत दाखल झाले होते. यावेळी राजाजी हॉ़ल येथे करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनादरम्यान चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला. तर ४० जण जखमी झाले आहेत. 

राजाजी हॉ़ल येथे करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यावेळी करूनिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सर्मथकांना नियंत्रणात आणणे पोलिसांना कठीण जात होते. त्यामुळे पोलिसांना सर्मथकावर लाठीमार करावा लागला.

यावेळी करुणानिधी यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करुणानिधींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मोदींना अश्रू अनावर झाले. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्या यालयाने  त्यासाठी परवानीगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे करुणानिधींच्या समर्थकांनी स्वागत केले आहे.