“करीना कपुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा”

68

पुणे,दि.२१(पीसीबी) – करीना कपुर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात “बायबल” या शब्दाचा वापर केल्या प्रकरणी ख्रिस्ती समाजातुन त्यांचा निषेध केला जात आहे.

या प्रकरणी “ख्रिश्चन एकता मंच” ने महाराष्ट्रातील अनेक भागातुन जोरदार निषेध चालवला आहे. त्याला समाजा कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी संबंधित कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात निषेध नोंदवत आहेत. तसेच या प्रकरणी करीना कपुर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी तीव्र मागणी सुध्दा करण्यात येत आहे.

धार्मिक भावना दुखावणे असे प्रकार ख्रिश्चन समाजास नवीन नाहीत. तसेच आशा प्रकरणांमध्ये आजवर कोणावरही कायदेशीर कार्यवाही होत नाही, असा इतिहासात घडलेल्या प्रकरणांवरुन समाजात समज आहे.

त्यावर ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष मा•प्रभुदास दुप्ते यांनी ख्रिश्चन मीडियाला माहिती दिली की, या प्रकरणी मंचाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तसेच करीना कपुर यांचे मुंबई येथील निवासा नजीकच्या वरळी पोलिस स्टेशन मध्ये सुध्दा आम्ही तक्रार नोंदविण्यास गेलो असता पोलिसांनी पुराव्यांची मागणी केली आहे. अद्याप पुरव्या अभावी वरळी पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही. त्यासाठी आम्ही सीडी, फोटो इत्यादी च्या माध्यमातुन पुरावे सादर करणार आहोत, असे ते म्हणाले.

मा• दुप्ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी लातुर या ठिकाणी आम्ही पोलिसात तक्रार देण्यास गेलो असता, तेथील पोलिसांच्या बोलण्यावरून असे लक्षात येत होते की, सदर प्रकरणी ख्रिश्चन समाजातुन होत असलेला विरोध व निषेध केला जात आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्यास, करीना कपूरच्या निवासा समोर आंदोलन करू असा ख्रिश्चन एकता मंचाने दिलेला इशारा याची माहिती करीना कपुर यांचे पर्यंत पोहोचलेली आहे, असा आम्हाला अंदाज आहे, असे मा• दुप्ते यांनी सांगितले.

दरम्यान येत्या दोन तीन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री मा• उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन देणार आहोत.
निवेदन दिल्यानंतर तक्रार दाखल न झाल्यास, 27/7/21रोजी करीना कपूरच्या घरा बाहेर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ असेही यावेळी सांगणार आहोत, असे दुप्ते यांनी सांगितले.

दरम्यान सबंध महाराष्ट्रातून ख्रिश्चन एकता मंचच्या कार्यकर्त्यांची ह्या आंदोलना करता उत्स्फूरतपणे तयारी सुरु आहे असे चित्र सध्या ख्रिस्ती समाजात

WhatsAppShare