कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण – विलासकाका यांच्यामध्ये दिलजमाई?

73

सातारा, दि. ७ (पीसीबी) – कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचे वैर आहे. मात्र, काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी चव्हाण यांनी विलासकाकांसोबत जुळवून घ्यावे, अशा सुचना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते. त्याचबरोबर विलासकाकांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. त्याबाबत काँग्रेसमध्ये एकमतही झाले आहे. त्यामुळे आता चव्हाण आणि उंडाळकर यांच्यामध्ये दिलजमाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.